आपल्या साक्षीमध्ये हेडली म्हणाला, इशरत जहाँ आणि अन्य काही लोक गुजरातमध्ये घातपात घडविण्यासाठी दाखल झाले होते. तिचे नेतृत्व अबू आयमाची आई करत होती. २६/११ हल्ल्याचा मास्टरमार्इंड झकी-उर-रहमान-लख्वी याने हेडलीला मुझम्मिलच्या फसलेल्या ऑपरेशनबद्दल माहिती दिली. ह्या ऑपरेशनमध्ये एक महिला सहभागी होती, मात्र ऑपरेशनपूर्वीच तिला पोलिसांनी मारल्याचे माझ्या ऐकण्यात आले, असे हेडलीने न्यायालयाला सांगितले. त्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हेडलीला तीन नावे सांगितली.