इशरतला शहीद म्हणणार्‍यांनी माफी मागावी : भाजप

शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2016 (09:42 IST)
नवी दिल्ली- मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीने इशरत जहाँ ही लष्कर-ए- तोयबाची दहशतवादी असल्याचे विशेष कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले. यानंतर राजकारण सुरू झाले आहे. ‘इशरत जहाँला शहीद म्हणणार्‍यांनी माफी मागावी’, अशी मागणी भाजपने केली आहे.
 
‘सुरक्षेच्या कारणावरून जे राजकारण करत होते त्यांनी आता माफी मागायला हवी. इशरतला शहीद ठरवणार्‍यांनी तर नक्कीच माफी मागावी. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही 
 
देशाची आणि भाजपची माफी मागितली पाहिजे’, असे केंद्रीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले.
 
‘हेडली साक्षीत काय बोलणार आहे हे आधीच काही लोकांनी मला सांगितले होते. त्यांना ते कसे कळले याचे आश्चर्य वाटते. हेडलीने साक्षीत इशरतचे नाव घेण्यासाठी एक डील झाली आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे’, असे 
 
वक्तव्य काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केले.
 
राष्ट्रवादी कोणत्याही दहशतवाद्याला पाठीशी घालणार नाही, असे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा