आरुषी प्रकरणाची सुनावणी 8 जूनपर्यंत लांबणीवर

वेबदुनिया

मंगळवार, 5 जून 2012 (12:30 IST)
WD
गाझियाबाद येथील विशेष सीबीआय न्यायालयाने आरुषी तलवार आणि हेमराज हत्याकांड प्रकरणाची सुनावणी 8 जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. स्थानिक न्यायालयातील एका वकिलाचे निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर बार असोसिएशन ऑफ गाझियाबादच्या वकिलांनी बंदचे आवाहन केल्याने दुहेरी हत्याकांड प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

वर्ष 2008मध्ये उत्तर प्रदेशातील नोएडा शहरात आरुषी तलवार आणि हेमराज हत्याकांड झाले होते. आरुषीचे वडील राजेश तलवार आणि आई नुपूर तलवार हे या प्रकरणातातील प्रमुख आरोपी आहेत. नुपूर सध्या डासना तुरुंगात आहे तर राजेश तलवार जामिनावर सुटला आहे.

वेबदुनिया वर वाचा