आरिफ एजाजला जिहादीं संघटनेकडून श्रद्धांजली

शनिवार, 30 ऑगस्ट 2014 (17:11 IST)
अन्सार-ऊल-तौहीद या जिहादी संघटनेने कल्याणमध्ये राहणारा तरुण आरिफ एजाज माजिदच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहिली आहे. मागील आठवड्यात इराकमधील दहशतवादी कारवाईत सामील झालेल्या 23 वर्षीय आरिफचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या सहकार्‍यांनी दिली होती.
 
अन्सर-उल-तौहीदने आरिफला ऑनलाईन श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचा एक फोटो सोशल नेटवर्किंग साइट 'ट्विटर', 'फेसबुक'वर पोस्ट केला आहे. आरिफ शहीद झाल्याचे शेअर करण्‍यात आलेल्या फोटोच्या खाली म्हटले आहे. आरिफच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कुटुंबियांनीही त्यांचा अंत्यविधी केला होता. उर्दू भाषेत लिहिलेल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की,'आम्हाला अल्लाचे काम पूर्ण करण्याचे काम दिले आहे. आपले बलिदानच आपल्याला यश मिळवून देईल. 
 
अन्सार-उल-तौहीद ही जिहादी विचाराची व दहशतवादी कारवायात गुंतलेली भारतातील सर्वात सक्रिय संघटना आहे.

वेबदुनिया वर वाचा