रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना ठार मारण्याचा धमकीचा ईमेल आला आहे. दहशतवादी संघटना ‘इसिस’च्या नावाने हा ईमेल त्यांच्या खासगी ईमेल अकाउंटवर पाठवला गेला आहे. मुंबई पोलिसांनी यावृत्ताला दुजोरा दिला आहे. हा कोणाचा तरी खोडसाळपणा असू शकतो, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आणि मुंबई पोलिसांचे सायबर सेलचे अधिकारी याचा तपास करत आहेत.