आरटीओ बंद करण्याचे नितीन गडकरींचे संकेत

बुधवार, 20 ऑगस्ट 2014 (10:39 IST)
'लक्ष्मीदर्शना'चे दुकान बनलेले आरटीओ कार्यालये बंद केली जातील, असे संकेत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी संकेत दिले आहे. त्यानंतर सर्व कामे ऑनलाइन होतील. त्यासाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात सरकार नवीन मोटार वाहन विधेयक सादर करणार आहे. 
 
आरटीओमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास आल्याचेही गडकरींनी कबूल केले. लायसेन्स तयार करण्यापासून ते परमिट आणि रजिट्रेशनपर्यंत सर्वच पातळ्यांवर भ्रष्टाचाराचा बाजार मांडल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी आरटीओचे हे दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गडकरी यांनी मुंबईत बोलताना सांगितले.
 
गडकरी म्हणाले, अनेक जुने कायदे व प्रणाली संपुष्टात आणण्याची वेळ आली आहे. नवा कायदा तयार केला आहे. आरटीओऐवजी लवकरच नवीन व्यवस्था अस्तित्वात आणली जाईल. दरम्यान, दिल्लीतही मंगळवारी इंडियन रोड काँग्रेसच्या बैठकीनंतर गडकरी यांनी गोष्टीचा पुनरुच्चार केला. अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, जपान, जर्मनी व ब्रिटनमधील कायद्यांच्या धर्तीवर मोटावर वाहन दुरुस्ती विधेयक तयार करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा