आरएसएस’चे विचार विद्यार्थवर लादणचा प्रत्न : राहुल

शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2016 (09:43 IST)
नवी दिल्ली- ‘देशातील विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कालबाह्य विचार लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस हे कदापि होऊ देणार नाही,’ असा इशारा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘जेएनयू’प्रकरणी सरकारला दिला.
 
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादाच्या पाश्र्वभूमीवर राहुल गांधी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राहुल यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. देशविरोधी कारवायांमध्ये एखाद्याचा सहभाग असेल तर त्याला जरूर शिक्षा व्हायला हवी. मात्र, राष्ट्रवादाच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर विशिष्ट विचारसरणी‘ लादण्याचे प्रयत्न होता कामा नयेत. एखाद्या घटनेची हवा करून संपूर्ण विद्यापीठाला बदनाम करणे चूक आहे. 

वेबदुनिया वर वाचा