आयुक्त बिपीन मलिक यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव

शुक्रवार, 25 जुलै 2014 (16:06 IST)
राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातत सुरु असलेल्या अनागोंदी कारभारामुळे शिवसेनेने शुक्रवारी सकाळी  निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्याविरुद्ध लोकसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांना मिळणार्‍या हिन वर्तवणुकीचा निषेधही शिवसेनेतर्फे करण्यात आला. यापूर्वीही शिवसेनेने गेल्या आठवड्यात आंदोलन केले होते. यामुळे आता याप्रकरणी सरकारला स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. बागपतचे भाजपचे खासदार सत्यपाल सिंह यांना शाही मानपान मिळाला होता. मात्र, मराठी खासदारांना राहण्यासाठी साध्या खोल्याही मिळत नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. महाराष्ट्र सदनात भोजनाची व्यवस्था अत्यंत वाईट असल्याचेही शिवसेनेच्या खासदारांनी सांगिते. 

वेबदुनिया वर वाचा