या यात्रेदरम्यान हायड्रोकार्बन, सागरी सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, कृषी आदी क्षेत्रात सहकार्यावर त्यांचा भर असेल. भारत आणि आफ्रिकेसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी या दौऱ्याचे महत्त्व असून या यात्रेतील मोजाम्बिकची भेट त्यासाठी महत्त्वाची आहे., असे पंतप्रधानांनी ट्विट करून सांगितले. दक्षिण आफ्रिकेतीलमधील प्रिटोरिया, जोहान्सबर्ग, डरबन ते पीटर मारित्जबर्ग आदी ठिकाणी ते भेट देणार असल्याचे सांगितले.
तंजानियाचे राष्ट्रपती डॉ. जॉन मागुफुलीस सोलर मामाज यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील केनियाच्या भेटीसंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे की, ”माझ्या केनियाच्या यात्रेदरम्यान राष्ट्रपती यू केन्याटा यांच्यासोबत आर्थिक मुदद्यांवर चर्चा करणार असून, दोन्ही देशातील संबंध अधिकच वृद्धिंगत होण्यावर भर असेल.” या दौऱ्याची माहिती त्यांनी फेसबुकच्या माध्यमातूनही दिली आहे.