अण्णां हजारेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

शुक्रवार, 29 ऑगस्ट 2014 (19:16 IST)
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले आहे. अण्णांनी पत्राद्वारे लोकपाल आयुक्त नियुक्त करण्याबाबत आठवण करून दिली आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अण्णांठनी प्रथमच पत्र लिहून लोकपाल नियुक्त करण्यातची मागणी केली आहे. यासोबत अण्णांनी मोदींचे अभिनंदनही केली आहे.

अण्णांनी पत्रात लिहिले आहे की, जनलोकपाल आंदोलनाला 28 ऑगस्ट तीन वर्षे पूर्ण झालीत. एप्रिल 2011 मध्ये आंदोलनाला प्रारंभ झाल्यानंतर 15 ऑगस्ट 2011 नंतर निर्णायक आंदोलन सुरु झाले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी लोकपाल विधेयक आणण्याबाबत एक समिती स्थापन केली होती. त्यावेळी विरोधी पक्ष नेता म्हणून भाजपनेही या लोकपाल विधेयकाला पाठिंबा दिला होता. हे विधेयक संसदेने डिसेंबर 2013 मध्ये बहुमताने मंजूर केले होते. देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी लवकरात लवकर लोकपाल व राज्यांत लोकायुक्तांची नियुक्ती करावी, असे अण्णांनी मोदींकडे अपेक्षा व्यक्त केली आहे.

तुम्ही 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते की, देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी माझे सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून अण्णांनी मोदींना आश्वासनाची आठवणही करून दिली.

वेबदुनिया वर वाचा