अडवाणींची 'गल्लाभरू' यात्रा: दिग्विजय सिंह

मंगळवार, 11 ऑक्टोबर 2011 (16:27 IST)
लाककृष्ण अडवाणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्यास कॉंग्रेसला चिंतेचे काहीच कारण नाही, असा टोला कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी हाणला आहे.

अडवाणींची जनचेतना यात्रा ही गल्लाभरू यात्रा असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्या आयोजनांमधून पैसा जमवण्यात हातखंडा असल्याची टिका त्यांनी यावेळी केली.

अडवाणींच्या यात्रेवर टिपणी करताना ते म्हणाले की, अडवाणींची यात्रा निघत आहे, मोदींची यात्रा निघत आहे आणि बाबा रामदेव यांचीही यात्रा निघत आहे. या सर्व यात्रांचे व्यवस्थापन आरएसएस करत असल्याचे ते म्हणाले.

अडवाणी आपल्या ३८ दिवसीय यात्रेची सुरूवात करत असून यादरम्यान भ्रष्ट्राचार, काळा पैसा, न्यायीक जबाबदारी आणि निवडणुक सुधारणांसारख्या मुद्दयावर ते जनजागरण करतील.

वेबदुनिया वर वाचा