बेपत्ता विमानाशी संपर्क नाही

शनिवार, 23 जुलै 2016 (11:46 IST)
भारतीय वायू दलाचे चेन्नई तांबरामहून पोर्ट ब्लेअर येथे जाणारे बेपत्ता विमानाशी संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही. या विमानात २९ प्रवासी असल्याची माहिती आहे. भारतीय हवाई दल, नौदल आणि तटरक्षक दलाकडून युद्धपातळीवर या विमानाचा शोध घेतला जात आहे.

अपघात झाला तर, त्याची तात्काळ माहिती देणारी यंत्रणा विमानात आहे. 

बंगलाच्या उपसागरात नौदलाकडून टेहळणी विमानाव्दारे नव्या विमानाचा शोध घेतला जात आहे. डॉर्नियर विमान आणि चार युद्धनौका नौदलाने तैनात केल्या आहेत. सध्या १०० पेक्षा जास्त एएन-३२ विमाने भारतीय वायूदलाच्या सेवेत आहेत.

वेबदुनिया वर वाचा