गुरुजनांना योग, प्राणायमाची सक्ती

गुरूवार, 3 सप्टेंबर 2015 (10:46 IST)
शाळांमध्ये योगासनाचा अभ्यास सक्तीचा केल्यानंतर आता गुरुजनांनाही योगासन सक्तीचे करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर गुरुजनांनाही प्राणायाम करावेच लागणार आहे.
 
शिक्षकांना योगासन सक्तीचे करण्याबाबत केंद्र सरकार पावले उचलत असून, सुरवातीला त्याची अंमलबजावणी केंद्रीय विद्यालयांमध्ये करण्यात येत आहे. केंद्रीय विद्यालयातील शिक्षकांना लोणावळ्यात प्रशिक्षण देण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा