नानकवाणी

नानकदेव व त्यांचा मित्र मर्दाना यांनी घर सोडून देवाच्या शोधात बरेच भ्रमण केले. या काळात त्यांना प्रसिद्ध सुफी संत शेख फरिद यांचाही सहवास लाभला. त्यांच्याही रचना गुरू ग्रंथसाहिबात आहेत. 

नानक यांची जपूजी प्रसिध्द आहेत. गुरूभक्ती, नामस्मरण, एकेश्वरवाद हे शीख धर्माचे मुख्य धार्मिक सिध्दांत आहेत. जपूजी ही ‍विशिष्ट पध्दतीने तयार केलेली सुसुत्रमय अशी वाणी आहे.

त्यात अर्थपूर्ण व संक्षिप्त भाषेत काव्यात्मक रचना करण्यात आली आहे. यात ब्रम्हज्ञानाचे अलौकीक ज्ञान आहे. या नानकवाणीची भाषा पंजाबी व हिंदी मिश्रित आहे.

वेबदुनिया वर वाचा