Guru Nanak Dev Quotes नानक देवाचे 10 अनमोल शब्द जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतील

सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (17:12 IST)
guru nanak Motivational Quotes दरवर्षी कार्तिक शुक्ल पौर्णिमेला शीख धर्माचे प्रथम गुरु, गुरु नानक देव यांची जयंती असते. ज्याला गुरु पर्व किंवा प्रकाश पर्व असे देखील म्हटलं जातं. तर जाणून घ्या गुरु नानक देव यांचे 10 अनमोल विचार guru nanak thoughts-
 
1. गुरु नानक देव म्हणतात की प्रत्येक मनुष्याने प्रथम स्वतःच्या वाईट आणि चुकीच्या सवयींवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 
2. प्रत्येक व्यक्तीने आपले जीवन नेहमी चांगल्या आणि नम्र सेवेने जगले पाहिजे, कारण अहंकार हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे, म्हणून मनुष्याने अहंकार बाळगू नये.
 
3. गुरू नानक देव यांना स्त्री आणि पुरुष यांच्यातील फरक समजला नाही, ते म्हणायचे की स्त्रियांचा कधीही अनादर करू नये.
 
4. नेहमी तणावमुक्त राहून आपण आपले कर्म सतत करत राहावे आणि नेहमी आनंदी राहावे.
 
5. गुरु नानक देवजी म्हणायचे की आपण नेहमी लोभ सोडला पाहिजे आणि कष्ट करून पैसा कमवून जीवन जगले पाहिजे.
 
6. गरजूंना मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर असले पाहिजे.
 
7. सर्व मानवांनी एकमेकांना प्रेम, एकता, समता आणि बंधुतेचा संदेश दिला पाहिजे. जेव्हा मन पापाने अशुद्ध होते, तेव्हा भगवंताच्या नामस्मरणाने ते पवित्र होते.
 
8. गुरु नानक देवजींनी 'इक ओंकार का' ही घोषणा दिली. ते म्हणायचे की, सर्वांचा पिता एक आहे, त्यामुळे सर्वांनी एकमेकांवर प्रेम केले पाहिजे.
 
9. गुरु नानक देव जी यांच्या मते, देव एक आहे आणि ते सर्वत्र उपस्थित आहे.
 
10. पैसा कधीही हृदयाशी जोडून ठेवू नये, त्याची जागा नेहमी खिशात असावी. तरच तुम्ही लोभ आणि अहंकारापासून दूर राहू शकाल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती