सबळ पुरावा आढळल्यास राज,अबूस अटक

भाषा

शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:50 IST)
उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर आर पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्याविरूद्ध सबळ पुरावा आढळल्यास अटक करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राज यांनी मुंबईत येणार्‍या हिंदी भाषिकांविरूद्ध मोहीम उघडल्यानंतर समाजवादी पक्षाने देश बचाव आंदोलन केल्याने मुंबईत तणाव निर्माण झाला आहे. राजला अटक झाल्यानंतर उद्भवणार्‍या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास पोलिस सक्षम असल्याचे सांगितले.

सरकारने शहरातील हिंसेनंतर करण्यात आलेली कारवाई व अटकसत्राबाबत केंद्रास अहवाल पाठवला आहे. सरकारने केलेल्या कारवाईवर केंद्र समाधानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा