मुंबईत सुमारे दीड लाख मनसे कार्यकर्ते आणि शेकडो पोलिसांच्या साक्षीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाईची मागणी वाढत आहे.
अशातच पुन्हा राज्य सरकारने सावध पावित्रा घेत राज यांच्या भाषणात खरंच काही प्रक्षोभक होतं का याचे अध्ययन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
स्वतः: मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कोल्हापुरात पत्रकारांना ही माहिती दिली. राज यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणा बद्दल त्यांना विचारले असता, मुद्द्याला बगल देत त्यांनी बघू, त्यांचे भाषण ऐकून निर्णय घेऊ असे उत्तर दिले. राज यांच्या भाषणावरून आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.