उत्तर भारतीयांविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर लवकरच कारवाई होण्याचे संकेत दिसत आहेत. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यासंदर्भात आज मुंबईच्या उच्चस्तरीय पोलिस अधिकार्यांबरोबर बैठक घेणार असून त्यात या कारवाईची दिशा निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक अनामी रॉय, मुंबईचे पोलिस आयुक्त हसन मुश्रीफ आणि पोलिस सहआयुक्त के. एल. प्रसाद यांच्यासोबत ही बैठक होणार आहे.