'राज' यांचा आणखी एक पैलू

शिवाजी पार्कवर मनसेच्या झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष राज ठाकरे यांचे अनेक पैलू काल कार्यकर्त्यांना पाहायला मिळाले. राज ठाकरे हे एक उत्कृष्ट राजकारणी तर आहेतच परंतु, ते एक चांगले व्यंगचित्रकारही आहेत.

या त्यांच्या दोन ओळखी बरोबरच ते उत्कृष्ट कलाही करू शकतात हे कार्यकर्त्यांनाच काय पण त्यांच्या निकटवर्तियांनाही ठाऊक नव्हते. काल याचा खुलासा राज यांच्या भाषणातून त्यांनी स्वतः:च केला. राज यांनी आपल्या भाषणात रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर टीकेची झोड उडवली.

यावेळी अगदी लालूंची हुबेहूब नक्कल राज यांनी केल्याने उपस्थित दिड लाखांवर कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला. लालू यांच्या विषयी बोलनाता राज म्हणाले, ( लालूंच्या भाषेत) 'हम राज के घर के सामने छट पुजा करुंगा, अरे येऊन तर दाखव.. परत जातो का बघू'? राज यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह संचारला.


लालूंची खरडपट्टी काढून झाल्यावर राज यांनी भाजपनेते आणि सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा यांचीही अगदी त्यांच्याच आवाजात खिल्ली उडवली. 'हमे पता है, हम राजसे मिले है, वो अच्छा आदमी, है असे म्हणणारे हे शत्रुघ्न सिंन्हा बिहार विषयी काय बोलतात, बिहार में सिर्फ एकही भाषा चलती है, एस्टोर्शनकी, म्हणजे काय? खंडणीची हे कोण म्हणतो, बिहारचेच सिन्हा, मग मी काय चुकीचे बोललो? राज यांनी अगदी शत्रुघ्न सिन्हा यांच्या आवाजात या वाक्यांची पुनरावृत्ती केल्याने कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारला.

वेबदुनिया वर वाचा