उत्तर भारतीयां विरोधात मुंबईत घडलेला प्रकार हा अत्यंत छोटा असल्याचे सांगत, आपण सामना वाचलाच नसल्याने बाळासाहेबांच्या अग्रलेखा विषयी आपल्याला काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी दिली आहे.
राजधानी पत्रकारांशी बोलताना जोशी म्हणाले की, राज यांनी उत्तर भारतीयां विरोधात केलेले वक्तव्य साधारण होते, त्याला बिहार मधील खासदारांनी उगीचच हवा दिली. आता संसदेतही या खासदारांनी जाणून-बुजून हा मुद्दा काढल्याचा आरोपही त्यांनी केला.