नाशिकमध्ये उत्तरभारतीय हटाव मोहीम

वेबदुनिया

शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:54 IST)
मनसे नेते राज ठाकरे यांच्या अटके विषयीच्या अफवांना राज्यात उधाण आले आहे. त्यांच्या घरी पोलिस दाखल झाल्याचे केवळ वृत्त धडकताच नाशिकमध्ये शालीमार भागात उत्तरभारतीयांच्या दुकानांवर हल्ले करण्यात आल्याने तणाव वाढला आहे.

यातच नाशिकमधील औद्योगिक वसाहतीतही याचे पडसाद उमटले आहेत. नाशिकमध्ये अंबड आणि सातपूर या परिसरात उत्तरभारतीयांच्या काही वसाहतीतून उत्तरभारतीयांनी भितीपोटी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

उत्तरप्रदेशकडे जाणार्‍या सार्‍या गाड्याभरुन जात असल्याचे वृत्त आहेत.या भागात काही टोळ्या समूहाने फिरत असून याभागातून उत्तरभारतीयांनी निघून जावे असी धमकीही ते या लोकांना देत असल्याचे समजते.

वेबदुनिया वर वाचा