मंगळवारी दिवसभर मुंबईत चाललेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर पोलिसांनी राज ठाकरे यांना अटक करण्याचा आपला निर्णय तूर्तास तरी लांबणीवर टाकला आहे.
दस्तूरखुद्द पोलिस महासंचालक डॉ.पी.एस पसरिचा यांना मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन राज यांना आत्ताच अटक करण्यात येणार नसल्याचे जाहीर केले, आणि दिवसभर रंगलेल्या राज यांच्या अटकेच्या अफवांना पूर्णविराम दिला.
आझमी आणि राज यांच्या विरोधात पुरावे जमविण्याचे काम अद्याप सुरूच असून, या दोघांविरोधात सबळ पुरावे मिळाल्यानंतरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.