भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात दीपा चव्हाण नावाच्या महिलेने स्वतःला भाजप आमदार गणेश नाईक यांची माजी प्रेयसी म्हणवून घेत तिला जीवे मारण्याची धमकी दिल्यावर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीवरून गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या तक्रारीत नाईक सोबत गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असून त्यांना15 वर्षांच्या मुलगा असल्याचे सांगितले आहे.महिलेने तक्रारीत म्हटले आहे की,या रिलेशनशिप पासून त्यांना एक 15 वर्षाचा मुलगा असून त्या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिला आहे. तर त्यांना ठार मारण्याची धमकी देखील गणेश यांनी दिली आहे. असा आरोप या महिलेने केला आहे.
महिलेने सांगितले की, मार्च मध्ये सीबीडी येथील गणेश नाईक यांच्या कार्यालयात स्वतःची रिव्हॉल्वर आपल्यावर रोखून ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर महिलेने नेरूळच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली असून त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही त्यामुळे आता या महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडे गणेश नाईक यांच्या विरोधात तक्रार केली असून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिले होते. गणेश नाईक यांनी पुढे येऊन स्वतःची डीएनए चाचणी करून या प्रकरणाचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी शिवसेने नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली.