उंदरांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी टॉमेटो मॅगीमध्ये घालून खाल्ल्याने महिलेचा मृत्यू

शुक्रवार, 29 जुलै 2022 (11:59 IST)
घरात उंदरांचा नायनाट करण्यासाठी विषारी औषध लावलेला टोमॅटो चुकुन खाल्ल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी घडली आहे. टीव्ही बघण्याच्या नाद्यात 27 वर्षीय महिलेने विषारी टॉमेटो घालून मॅगी बनवून खाल्ली. रेखादेवी फुलकुमार निशाद असे मृत महिलेचे नाव आहे.
 
मालाड पश्चिम येथील मार्वे रोड परिसरातील पास्कल वाडी येथे वास्तव्यास असलेल्या या महिलेने उंदरांचा नायनाट करण्यासाठी टॉमेटोला विषारी औषध लावून ठेवले होते. परंतू 20 जुलै रोजी त्यांनी त्याच टॉमेटोचा वापर करत मॅगी बनवली. मॅगी खाल्ल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपाचारासाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 
 
रुग्णालयाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. नंतर पोलिसांनी महिलेच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून काही वस्तू ताब्यात देखील घेतल्या आहेत. तसेच महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती