महापालिकेची वाशी, नेरुळ, ऐरोली, बेलापूर, तुर्भे येथील रुग्णालये, कामगार विमा रुग्णालय तसेच २३ नागरी आरोग्य केंद्रांत लसीकरणाची ही जनअभियान योजना राबवण्यात आली. यात एकूण २१ हजारांपेक्षा अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. नवी मुंबईत १८ वर्षांवरील १०० टक्के नागरिकांचे दोन्ही लसमात्रांचे राज्यात सर्वात प्रथम १०० टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरण मोहीम देशात सुरू झाल्यानंतर बहुतांश नागरिकांनी पहिली व दुसरी लसमात्रा घेतली आहे.