मुंबईत पालिकेच्या नायर रुग्णालयात १३ जुलैपासून १२-१७ वयोगटातील लहान मुलांची लसीकरण क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. जायडस कॅडिलाची Zycov-D ही लस मुलांना देण्यात येत आहे. यासाठी ५० मुलांची गरज आहे. पण आतापर्यंत फक्त ५ मुलांनी नाव नोंदणी केली असून लशीचा पहीला डोस घेतला आहे. मुलांनी लशीचे तीन डोस चार आठवड्याच्या अंतराने घ्यायचे आहेत. अहमदाबाद येथील फार्मा कंपनी जायडस कॅडीलाची जायकोव-डी पी पहीली DNA आधारित लस आहे. कोवॅक्सिननंतर ही दुसरी स्वदेशी लस आहे. नायर रुग्णालय हे मुंबईतील पहीलं रुग्णालय आहे जिथे मुलांवरील लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.
लसीच्या प्रोटोकॉलनुसार या लसीच्या चाचणीसाठी मुलांच्या आईवडीलांची लेखी परवानगी व व्हिडीओतून दिलेली परवानगी आवश्यक आहे. या लसीकरण ट्रायलमध्ये जास्तीत जास्त लहान मुलांनी सहभाग घ्यावा यासाठी रुग्णालयांने दोन हेल्पलाईनही दिल्या आहेत. 022-23027205 ,23027204 जे पालक आपल्या मुलांना या ट्रायलमध्ये पाठवू इच्छितात त्यांनी वरील क्रमांकावर संपर्क करावा व आपल्या सर्व शंकाेचे निरसन करून घ्यावे असे सांगण्यात आले आहे.