चला राणीच्या बागेत जाऊ या, राणीच्या बागेचे दरवाजे १५ फेब्रुवारीपासून खुले होणार

बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (08:32 IST)
मुंबईतल्या राणीच्या बागेचे दरवाजे येत्या १५ फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी खुले होणार आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना, पर्यटकांना राणी बागेतील पक्षी, प्राणी, पेंग्विन जवळून आणि निसर्गाचा सहवास पुन्हा लाभणार आहे.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई महापालिकेने नागरिक, पर्यटक, प्राणी, पक्षी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १५ मार्च २०२० पासून राणीच्या बागेचे दरवाजे बंद करण्यात आले होते.यामुळे  राणी बागेच्या माध्यमातून दरमहा मिळणाऱ्या ४५ लाख रुपये इतक्या उत्पन्नाला पालिकेला मुकावे लागले. गेल्या ११ महिन्यांत राणीची बाग कोरोनामुळे बंद ठेवण्यात आल्याने पालिकेचे जवळजवळ ५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. मात्र आता पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यांनी परवानगी दिल्यास राणीच्या बागेचे दरवाजे सर्वांसाठी खुली होणार आहे.
 
पालिकेच्या तिजोरीतही राणी बागेच्या माध्यमातून दररोज दीड लाख रुपये जमा होण्यास पुन्हा सुरुवात होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. मात्र राणी बाग पर्यटकांसाठी खुली होण्यापूर्वी मुंबईकरांना, पर्यटकांना कोरोना विषयक योग्य ते नियम पाळणे गरजेचे आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती