ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड (DMCSL) शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 188.41कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. तपासात असे आढळून आले की सुरेश कुटे यांच्या नेतृत्वाखालील डीएमसीएसएल व्यवस्थापनाने 4 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आणि वैयक्तिक फायद्यासाठी पैसे कुटे ग्रुपच्या संस्थांना हस्तांतरित केले.
ईडीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, तात्पुरत्या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असलेल्या कुटे ग्रुप ऑफ कंपन्यांच्या विविध संस्थांची जमीन, इमारती, प्लांट आणि यंत्रसामग्री यांचा समावेश आहे.