मयत मुलगा शेजारील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील खैरेपाड़ा येथील रहिवासी असून अनुदानित आदिवासी आश्रमशालेचा विद्यार्थी होता. टोकावडे पोलिस ठाण्याच्या निरिक्षकांनी सांगितले की, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.