राज्यात घर घेणे महागणार

शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (10:07 IST)
महाराष्ट्र सरकारच्या मुंबईसह ज्या शहरांमध्ये मेट्रोसंबंधीत बांधकामं सुरु आहेत अशा शहरांमध्ये सरकारने नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 1 एप्रिल 2022 पासून घरांवरील स्टँप ड्यूटीच्या शुल्कात 1 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय लागू केला आहे. सर्वसामान्य नागरिक मेट्रो सेसच्या नावाने हा कर समजू शकतात. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जनतेच्या खिश्यावरील अतिरिक्त बोजा वाढणार आहे. दरम्यान मुंबईत गेल्या काही दिवसांपासून घरांच्या रजिस्ट्रेशचा वेग वाढला आहे.  
 
मेट्रो सेसच्या वाढीपूर्वीच बंपर रजिस्ट्रेशन
सरकारी आकडेवारीनुसार, एकट्या मुंबईत गेल्या महिन्यात 10,379 च्या तुलनेत या महिन्यात आतापर्यंत सुमारे 17 टक्के अधिक म्हणजे 12,619 रजिस्ट्रेशन झाले आहे. म्हणजेच मार्च महिन्यात आत्तापर्यंत सरकारला 836 कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. परिणामी दक्षिण मुंबईतील रजिस्ट्रेशन ऑफिसबाहेर स्टँप ड्यूटी आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनसाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मेट्रो सेस वाढीसाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत नागरिक वेळेत प्रॉपर्टी रजिस्टर करत 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या 1 टक्के करातून सुटका करून घेत आहे. रजिस्टर्ड ऑफिसमध्ये आलेल्यांमध्ये गिफ्ट डीड अंतर्गत प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठी आलेल्यांचाही समावेश आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती