मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी ते अमृतसर आणि चेन्नई दरम्यान स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 01057 सीएसएमटी - अमृतसर ट्रेन 10 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज रात्री 11.30 वाजता मंबईहून सुटेल आणि अमृतसरला तिसर्या दिवशी सायंकाळी 4.15 वाजता पोहोचेल. परतीकरिता 01058 ट्रेन 13 एप्रिलपासून अमृतसर येथून दररोज सकाळी 8.45 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला तिसर्या दिवशी रात्री 12.05 वाजता मुंबईत पोहोचेल.