मुंबईत रात्री 10 वाजते पर्यंत दुकानं खुली

मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (10:23 IST)
सध्या कोव्हिडचा प्रादुर्भाव जरी कमी झाला आहे परंतु कोरोना अद्याप गेलेला नाही.सध्या राज्य सरकार ने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे नागरिकांना काही मुभा देण्यात आली आहे.आता सणासुदीचे दिवस जवळ असल्याने मुंबईच्या व्यापाऱ्यांची मागणी होती की बाजारपेठांतील दुकाने खुली ठेवण्याच्या वेळेत वाढ करावी जेणे करून व्यापारी वर्गाला त्याचा फायदा होऊ शकेल. राज्यात इतर शहरात दुकाने उघडे असण्याची वेळ रात्री 8 पर्यंत आहे.मुंबईत कोविडच्या नियमावलीतून नागरिकांना काहीशी मुभा देण्यात आली आहे.तरी काही निर्बंध कायम असणार.
 
व्यापारी वर्ग आता दुकाने रात्री 10 वाजे पर्यंत खुले ठेवू शकतात,मेडिकल स्टोअर्स 24 तास चालू असणार, हॉटेल, रेस्तराँ मध्ये सोमवार,शनिवार 4 वाजे पर्यंत सुरु असणार 4 वाजे नंतर टेक अवे मध्ये पार्सल नेता येऊ शकत. सिनेमाचं शूटिंग सुरु असणार, जिम,योगा केंद्रे,सलून,ब्युटीपार्लर,स्पा,हे 50 टक्केच्या क्षमतेने सोमवारते शुक्रवार रात्री 8 वाजे पर्यंत तसेच दुपारी  3 वाजे पर्यंत सुरु असणार.शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे,राजकीय , सांस्कृतिक, धार्मिक सोहळ्यावर निर्बंध,सिनेमा,नाट्यगृहे,स्विमिंग पूल,क्रीडा केंद्रे सर्व बंद असणार.  
 
रविवारी पूर्णपणे काही आवश्यक गोष्टीना वगळता सर्व बंद असणार.नागरिकांनी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणे बंधन कारक आहे.सामाजिक अंतर राखणे,मास्कचा वापर करणे सेनेटाईझरचा वापर करणे बंधन कारक आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती