मुंबईत १५ जानेवारीपर्यंत शाळा बंदच राहणार

बुधवार, 30 डिसेंबर 2020 (08:41 IST)
कोरोनाच्या नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून या शाळा १५ जानेवारीपर्यंत बंदच राहतील असा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारी म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा व महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेडून घेण्यात आला आहे. 
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबत महत्त्वाची बाब म्हणजे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२वीच्या पूर्वनियोजित पुरवणी परिक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येतील अशा सूचना महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती