नवी मुंबईच्या ज्वेलर्स शॉप मध्ये दरोडा, हेल्मेट घालून 3 दरोडेखोर शिरले
सोमवार, 29 जुलै 2024 (15:40 IST)
खारघर नवीमुंबईच्या एका ज्वेलर्सच्या दुकानात हेल्मेट घालून आलेल्या 3 दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत दरोडा टाकण्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी दरोडा टाकून जातांना गोळीबार केल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.
व्हिडीओ मध्ये तीन दरोडेखोर ज्वेलर्सच्या दुकानात शिरतात आणि कामगारांशी वाद करतात. नंतर शस्त्राचा धाक दाखवत दागिने लुटून गोळीबार करत पसार होतात.
खारघरातील एका दागिन्यांच्या दुकानात रविवारी तीन दरोडेखोर शिरतात आणि शस्त्राचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांशी मारहाण करत दागिने लुटतात. एक व्यक्ती सुरक्षेच्या दृष्टीने अलार्म वाजवतो. दरोडेखोरांनी दुकानाच्या मालकाशी मारहाण केली आणि बेगेत दागिने भरतात.
अलार्मची आवाज ऐकून दुकानाच्या बाहेर लोकांची गर्दी होते. हे पाहून दरोडेखोरांनी हवेत गोळीबार केली आणि पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.