आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थनार्थ राजीनामे

बुधवार, 6 जुलै 2022 (15:06 IST)
शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर खिंडार पडायला सुरुवात सुरुवात झाली आहे. आमदार प्रकाश सुर्वे  यांच्या समर्थनार्थ मागाठाणेतील दोन शाखाप्रमुख, तीन महिला शाखा संघटकांचे राजीनामे दिले आहेत.
 
मुंबईत काही आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सुरु आहेत. मुंबईत आता शिवसेनेला संघटनात्मक पातळीवरही खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत शिवसेनेचे चार आमदार शिंदे गटात गेल्यानंतरही आतापर्यंत संघटनात्मक पातळीवर कुणीही राजीनामे दिले नव्हते, परंतु आता बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. मागाठाणेतील दोन शाखाप्रमुख आणि तीन महिला शाखा संघटकांचे पदाचे राजीनामा दिले आहेत.

शाखा क्रमांक 3चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि महिला संघटक सुषमा पुजारी, शाखा क्रमांक 12 चे शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामूणकर, शाखा क्रमांक 26 च्या महिला शाखा संघटक हेमलता नायडू, शाखा क्रमांक 5च्या महिला शाखा संघटक विद्या पोतदार यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
 
बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांचे शक्तीप्रदर्शन होत आहे. तत्पूर्वी मतदारसंघातील शिवसेना पदाधिका-यांनी राजीनामा देत सुर्वे यांचे समर्थन केले आहे. दरम्यान, बंडखोर आमदार डोळ्यात डोळे घालू बोलू शकणार नाहीत, असे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.  बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आले. दोघांनीही हस्तांदोलन केले. दोघांची भेट आणि संभाषण कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र या संभाषणात प्रकाश सुर्वे काहीही बोलू शकले नाहीत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती