रेणू शर्मा यांचा वकील रमेश त्रिपाठीवरच विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांच्याबाबत आता विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. त्यांच्यावर 2018 साली वाशीच्या एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळतेय. आपल्या महिला असिस्टंट वकिलावर विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप असून, त्यांच्यावर कलम 354 (अ)च्या कलमाखाली गुन्ह्य दाखल असल्याचंही समजतंय. याच प्रकरणावर येत्या 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.