पावसामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा

शनिवार, 17 जुलै 2021 (11:15 IST)
सतत दोन दिवसा पासून येणाऱ्या मुसळधार पावसानं महाराष्ट्राची राजधानी मुंबईला झोडपून काढले आहे.हवामान खात्याने आजही मुंबईत मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे.
 
गेल्या दोन दिवसांपासून पाऊसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली.मुंबईत रस्त्यावर तुडुंब पाणी साचले असून वाहतुकीत अडथळा येत आहे.जागोजागी पाणी साचल्याने लोकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुंबईतील जनजीवन या पावसामुळे विस्कळीत झाले आहे.काही भागात पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे.
 
मुंबईत विमानतळावर देखील पाणी साचल्यामुळे विमान उड्डाण करण्याच्या वेळेत देखील बदल करण्यात आला आहे.हवामान खात्याने आज काही भागात मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे.
 
हवामान खात्याने मुंबई,ठाणे,रायगड या जिल्ह्यात रेड अलर्ट सांगितले आहे.या ठिकाणी पुढील 24 तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
 
शुक्रवारी पावसाने लावलेल्या झडीमुळे मुंबईतील दादर,परळ,सायन,वडाळा, अशा काही भागात पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते.काही रेल्वे रुळांवर देखील पाणी साचले होते.त्यामुळे काही लोकल रेल्वे देखील उशिरा धावत होत्या. 

आज देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामानखात्याने वर्तवली आहे.नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये असेही प्रशासन कडून आणि तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती