म्हाडाचे फ्लॅट टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याच्या निर्णयाला स्थगिती

बुधवार, 23 जून 2021 (08:12 IST)
महाविकास आघाडीत अनेकदा मंत्र्यांनी घेतलेले निर्णय मुख्यमंत्र्यांनी बदलवल्याचे काही वेळा दिसून आले आहे. आता देखील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाचे फ्लॅट टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. म्हाडाचे फ्लॅट टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते इमारत हस्तांतराचा कार्यक्रम पार पडला होता. कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांच्या तात्पुरत्या निवासासाठी म्हाडातर्फे टाटा कॅन्सर रुग्णालयाला या सदनिका देण्यात आल्या होत्या.
 
शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. या इमारतीच्या बाजूच्या रहिवाशांचा याला विरोध असल्याचे चौधरी यांच्या तक्रारीत म्हटले आहे. त्यापार्श्वभूमीवर मु्ख्यमंत्री यांनी म्हाडाचे फ्लॅट टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय म्हणजे राष्ट्रवादीला दणका असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती