कोण आहे सिद्धार्थ पिठानी? ज्याला सुशांत प्रकरणात हैदराबादहून केली अटक

शुक्रवार, 28 मे 2021 (17:25 IST)
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात NCB ने त्याच्या रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली आहे. सिद्धार्थला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आलं. याआधीही अनेकदा एनसीबीकडून सिद्धार्थची चौकशी करण्यात आली होती.
 
सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीला मागील वर्षी जूनमध्ये देखील याच प्रकरणात चौकशीसाठी अटक केली गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने त्याच्याशी अनेकदा चौकशी केली आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्याला अटक करण्यात आली. सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीच्या आधी ही अटक करण्यात आली. यापूर्वी सीबीआयनेही पिठानीची चौकशी केली होती. सप्टेंबर 2020 मध्ये सीबीआयने चौकशी केली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 
 
काही दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा
काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ पिठानीची सगाई झाली. आणि त्याने एंगेजमेंट फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहेत. यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी त्याला खूप ट्रोल देखील केले होते. फोटो शेअर करत सिद्धार्थ पिठानीने लिहिले होते- जस्ट ‘एंगेज्ड’. या फोटोंमध्ये तो आपल्या मंगेतरसह खुश दिसत होता.
 
गेल्या वर्षी सुशांतसिंग राजपूत जेव्हा त्याच्या मुंबईच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता तेव्हा त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि सिद्धार्थ पिठानी यांच्यावर बरेच प्रश्न उभे राहले होते. मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे सिद्धार्थ पिठानीनेच पहिल्यांदा सुशांतला पंख्याला लटकलेले पाहिले. याशिवाय त्याच्यावर सुशांतला ड्रग्स पुरविल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
 
कोण आहे सिद्धार्थ पिठानी?
सिद्धार्थ पिठानी सुशांत सिंह राजपूतचा फ्लॅटमेट होता आणि सुशांतच्या मृत्यूच्या वेळेस घरात असणार्‍या 4 सदस्यांपैकी एक आहे. सिद्धार्थ पिठानी हा सुशांतचा जवळचा मित्र आणि रूममेट असल्याचं सांगितलं जातं. तो सुशांतचा क्रिएटिव कंटेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. सीबीआय तपासणीत जेव्हा सिद्धार्थ पिठानी सह सैमुअल मिरांडा आणि माजी मेनेजर दिपेश सावंत यांची चौकशी करण्यात आली तेव्हा या तिघांनी कबुली दिली होती की सुशांतच्या घरातून काही आयटी लोकांद्वारे  इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे डेटा हटवण्यात आला होता. डेटा डिलीट करण्याचं काम सुशांत सिंह राजपूतच्या माजी मेनेजर दिशा सालियानच्या मृत्यू आणि रिया चक्रवर्तीने घर सोडण्याच्या दरम्यान केले गेले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती