सुशांत सिंह राजपूतच्या रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक

शुक्रवार, 28 मे 2021 (13:21 IST)
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात NCB ने त्याच्या रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली आहे. सिद्धार्थला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आलं. याआधीही अनेकदा एनसीबीकडून सिद्धार्थची चौकशी करण्यात आली होती. 
 
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात षडयंत्र रचल्याच्या आरोपावरुन सिद्धार्थला अटक करण्यात आली असून लवकरच त्याला मुंबईत आणणार असल्याची माहिती मिळत आहे. सिद्धार्थच्या अटकेमुळे आता प्रकरणाला कोणतं नवं वळण येण्‍याची शक्यता आहे.
 
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येमागे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआयही तपास करत होती. यादरम्यान चौकशीसाठी सुशांतच्या मैत्रिण रिया चक्रवर्तीलाही अटक करण्यात आली होती. तिच्यावर सुशांतला आपला भाऊ शौविक चक्रवर्तीच्या मदतीने ड्रग्स पुरवल्याचा आरोप होता. हे प्रकरण अनेक वळणं घेत असताना या प्रकरणातून पुढे अनेक सेलिब्रिटींना तपासाला सामोरं जावं लागलं होतं. दरम्यान, या प्रकरणी एनसीबीने मार्च महिन्यात न्यायालयात तब्बल ६० हजारहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांच्यासह ३३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
 
सिद्धार्थ हा १४ जून रोजी सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा घरी उपस्थित होता. सिद्धार्थ हा सुशांतचा मित्र आणि रुममेट असल्याचं सांगितलं जातं. तो सुशांतचा क्रिएटिव्ह कंटेट मॅनेजर म्हणून काम करत होता. सिद्धार्थचा गेल्या आठवड्यात साखरपुडा झाला असून साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती