ठाण्यात सीबीआय अधिकारी म्हणून ऑनलाइन 59 लाख रुपयांची फसवणूक

शुक्रवार, 6 डिसेंबर 2024 (17:31 IST)
महाराष्ट्रातील ठाणे शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या कथित गुन्हेगारी कारवायांसाठी सायबर फसवणूक करणाऱ्यांनी कस्टम्स आणि सीबीआय अधिकाऱ्यांची तोतयागिरी करून त्याच्यावर कारवाई करण्याची धमकी दिल्याने 59 लाख रुपयांची फसवणूक केली. 

सदर घटना 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान घडली असून पीडित ला एकाच व्यक्तीचे बऱ्याच वेळा कॉल आले. त्याने स्वतःला दिल्लीचे कस्टम अधिकारी सांगून तुमच्या नावाचे एक पार्सल मिळाले आहे आणि त्यामध्ये ड्रुग्स मिळाले आहे. आणि प्रकरण पुढील तपासणीसाठी सीबीआयला पाठवत असल्याचे  सांगितले. त्याने पीडितेला सहकार्य करण्यासाठी एक कॉल घेण्याचे म्हटले. 

नंतर पीडित ला एका सीबीआय अधिकारी बनून एकाने कॉल केला आणि पीडितचे नाव मनी लॉन्डरिंग मध्ये असल्याचे सांगितले. प्रकरण मिटवण्यासाठी त्याला काही पैसे द्यावे लागणार असे सांगण्यात आले.त्याला 59 लाख रुपयांची मागणी केली.भीतीपोटी पीडित ने पैसे वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले. नंतर याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने तातडीनं पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 318 (4) (फसवणूक) आणि 319(2) (तोतयागिरी करून फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला.
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती