मुंबई: फक्त कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा, नर्सेसचं कामबंद आंदोलन

बुधवार, 23 जून 2021 (10:19 IST)
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून आज आणि उद्या (बुधवार-गुरुवार) दिवसभर कामबंद आंदोलन पुकारलं आहे. त्यांचे म्हणणे आहे की फक्त कागदोपत्री कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा. जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देखील परिचारिका संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.  
 
परिचारिकांचा राज्य सरकारला इशारा
पाठीमागचे 2 दिवस परिचारिकांनी सकाळी 2 तास काम बंद आंदोलन केलं पण कोणत्याही मागण्या न झाल्याने आता दोन दिवस कामबंद आंदोलन असणार आहे.
सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढे 25 तारखेपासून बेमुदत आंदोलन सुरु करु, असा इशारा परिचारिका संघटनांनी दिला आहे. बेमुदत संपावर जाण्याआधी सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करावा, असंही परिचारिका संघटनांनी म्हटलं आहे.
 
परिचारिका संघटनांच्या मागण्या काय?
कायमस्वरूपी पदभरती करा
केंद्राप्रमाणे आम्हाला देखील जोखीम भत्ता द्या
कोविड काळात 7 दिवस कर्तव्यकाळ आणि 3 दिवस अलगीकरण रजा कायम ठेवावी,
कोरोना काळात बंद करण्यात आलेली साप्ताहिक सुट्टी सुरू करावी… यासह आणखी काही मागण्या आहेत.
कोरोनाच्या काळात आम्ही कुठे कामात थांबलो नाही, काम केलं आता सरकार मात्र आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही ही खेदाची बाब असल्याची खंत परिचारिका संघटना व्यक्त करत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती