महाराष्ट्रातील ठाणे शहर पोलिसांनी हिंदू धर्मगुरू कालीचरण महाराज यांना छत्तीसगडमधून अटक केली आहे. महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांना बुधवारी रात्री छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून अटक करण्यात आली होती. येथे त्यांना अशाच एका प्रकरणात तुरुंगात ठेवण्यात आले होते. आता त्यांना टान्झिट रिमांडवर ठाण्यात आणण्यात आले आहे.