मिळालेल्या माहितीनुसार यूएसआय हा नौदलाद्वारे चालवला जाणारा ९७ वर्षे जुना त्रि-सेवा क्लब आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियमित ऑडिट दरम्यान UCI मधील आर्थिक अनियमितता उघडकीस आल्या. यानंतर, कंत्राटी चार्टर्ड अकाउंटंट्सकडून एक विशेष ऑडिट करण्यात आले.
क्लब व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार, आर्थिक खात्यांचे सविस्तर ऑडिट करण्यात आले ज्यामध्ये विसंगती आढळून आल्या. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाच्या योग्य तपासासाठी मुंबई पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तसेच, स्वतंत्र चार्टर्ड अकाउंटंटकडून विशेष ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहे.