Mumbai : मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल उडवून देण्याची धमकी, 5 कोटींची खंडणीही मागितली

मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (12:36 IST)
महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून एक मोठी बातमी येत आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील उत्कृष्ट पंचतारांकित ललित हॉटेल उडवून देण्याची धमकी  देण्यात आली आहे. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार हॉटेल मालकाकडून 5 कोटी रुपयांची खंडणीही मागितली आहे. पैसे न दिल्यास हॉटेलमध्ये 4 ठिकाणी बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली आहे, असेही सांगण्यात आले आहे. 
घटनेनुसार, सोमवारी पंचतारांकित ललित हॉटेलला एक निनावी फोन आला ज्यामध्ये इमारतीमध्ये अनेक स्फोट होऊ नयेत म्हणून 5 कोटीरुपयांची खंडणी मागितली गेली .
 
एवढेच नाही तर या अज्ञात फोनकर्त्याने ललित हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा दावा केला असून हॉटेल व्यवस्थापनाने .त्यांना पाच कोटी रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्यास ते उडवून दिले जातील आणि हॉटेल उडवून दिले  जाईल, अशी धमकीही दिली मात्र, सुरक्षा तपासणी दरम्यान हॉटेलमध्ये कुठेही बॉम्ब आढळला आढळला नसल्याने ही अफवाअसल्याचे निष्पन्न झाले. सध्या मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल  केला असून पुढील तपास सुरू आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती