चक्रीवादळ निसर्ग: मुंबईचा धोका टळला

बुधवार, 3 जून 2020 (21:42 IST)
निसर्ग चक्रीवादळ आज मुंबईत दाखल होणार होतं परंतू त्यापूर्वीच वादळानं दिशा बदलली. आता चक्रीवादळ पनवेल, कर्जत खोपोली, नाशिक या मार्गे पुढे जाणार आहे.
 
अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासमोर नवं संकट उभं राहिलं होतं. दुपारी १:३० वाजता चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवरून जमिनीवर पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर अलिबाग मार्गे हे वादळ मुंबईत दाखल होणार होतं. 
 
सध्याची परिस्थिती बघता मुंबईतील हवाई वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
परंतू दुखद बातमी म्हणजे निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अलिबागमधील उमटे गावात ५८ वर्षीय व्यक्तीचा विजेचा खांब डोक्यात पडून मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती