Mumbai Rains: मुंबई आणि उपनगरात अतिवृष्टीचा इशारा,तिन्ही सैन्यदल सतर्क

सोमवार, 8 जुलै 2024 (21:32 IST)
मुंबईवरचे संकट टळले नाही! हवामान खात्याने दिला नवा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून मुंबई उपनगरातील विविध भागात पाणी साचले आहे. हवामान खात्यानं मुंबई आणि उपनगरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 
 
हवामान खात्यानं आज रात्री मुंबई आणि उपनगरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नॉकॉस्ट वार्निंग जारी केले आहे. IMD ने 9 जुलै रोजी मुंबई साठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासांत शहरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
पुढील काही तासांत मुंबईच्या पश्चिम, मध्य आणि दक्षिण भागात तसेच ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आधीच सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीएमसीने शहरातील रहिवाशांनी सावधगिरी बाळगावी आणि आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला आहे.
 
पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यांनी सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले.
 
शहरातील सर्व पाणी तुंबलेल्या ठिकाणी बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, एनडीआरएफ, बीएमसी सतर्क आहेत. पूर्व आणि पश्चिम महामार्ग आणि सर्व रेल्वे मार्गांवर वाहतूक सुरू आहे. एनडीआरएफ राज्यातील तीनही किनारी जिल्ह्यांमध्ये पोहोचले आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलही सतर्क असून गरज पडल्यास मदत घेतली जाईल.
 
मुंबईत सकाळी 1 ते सकाळी 7 वाजेपर्यंत शहरातील विविध भागात 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासांत कुलाबा येथे 83.8 मिमी तर सांताक्रूझ येथे 267.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
 
Edited by - Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती