मुंबई महापालिकेने इमारतींसाठी नवीन नियमावली जाहीर

मंगळवार, 4 जानेवारी 2022 (15:13 IST)
राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबईत परिस्थिती चिंताजनक होतेय.  याच पार्श्वभूमीवर मुंबईत आगामी काळात कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. मुंबईत इमारातींमध्ये वाढता कोरोना संसर्ग पाहता मुंबई महापालिकेने इमारतींसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.
 
इमारतींसाठीची नवीन नियमावली
१) इमारतीच्या एखाद्या मजल्यावर सक्रिय रुग्ण आढळ्यास तो मजला सील होईल.
 
२) एका इमारतीत १० हून अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील होईल.
 
३) कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास त्या मजल्यावरील घरातून बाहेर जाण्या- येण्यास बंदी
 
४) सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळलेल्या मजल्यावरील तसेच वरच्या आणि खालच्या मजल्यावरील सर्व लोकांची ५ व्या आणि ७ व्या दिवशी कोरोना टेस्ट होईल.
 
५) सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट झाल्याशिवाय इमारतीचे सील उघडले जाणार नाही. तसेच इमारतीतील नागरिकांना सक्तीने १४ दिवस क्वारंटाईन केले जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती