मुंबई लोकल सेवा पुन्हा होणार, राज्य सरकारने तयारी केली सुरु

गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (08:32 IST)
राज्य सरकारकडून यासंबंधी रेल्वेला पत्र पाठवण्यात आलं आहे. पत्रामध्ये राज्य सरकार करोनासंबंधित नियमांचं पालन करत लोकल सेवा पुन्हा एकदा सुरु करण्याचा विचार करत असल्याचं सांगण्यात आलं. लोकल सेवा कशा पद्धतीने सुरु करायची याचाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.
 
पत्रामध्ये लोकल सेवा एकाच वेळी सुरु न करता टप्प्याटप्प्याने सुरु कऱण्याचा उल्लेख आहे. तसंच यासाठी ठराविक वेळाही निर्धारित करण्यात आल्या आहेत. यानुसार अधिकृत तिकीट किंवा मासिक पास असणारी व्यक्ती सकाळी पहिल्या ७.३० ची पहिली लोकल, तसंच ११ ते ४.३० आणि रात्री ८ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करु शकते.
 
अत्यावश्यक सेवेतील प्रवासी ज्यांच्याकडे अधिकृत क्यूआर कोड आहे तसंच  ओळखपत्रासोबत अधिकृत तिकीट किंवा मासिक पास असणारे सकाळी ८ ते १०.३० तसंच संध्याकाळी ५ ते ७.३० च्या दरम्यान प्रवास करु शकतात. याशिवाय प्रत्येक एका तासाने महिला विशेष लोकल धावणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती