महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. सोमवारी शिवाजी पार्क येथे टेनिस खेळताना त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून हेअरलाईन प्लास्टर केलं आहे. दुखापत होताच हिंदुजा हॉस्पीटलमध्ये जाऊन उपचार घेतले. डॉक्टरांनी सध्या त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र तरीही त्यांनी पक्षाच्या बैठकीला पोहोचत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.